‘त्या’ प्रकारानंतर धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला पण….

जय महाराष्ट्र न्यूज, बीड   जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पक्षाशी गद्दारी केल्या प्रकरणी बीड जिल्हा परिषदेच्या 6 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना दिलासा मिळालाय. मात्र, आता सदस्यत्व रद्द झाल्यानंतर ग्रामविकास खात्याकडे अपील केली जाणारये. ग्रामविकास खाते भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे असल्याने ग्रामविकास खात्याकडून धनंजय मुंडे यांच्या हाती काय लागणार या चर्चेला उधाण […]

‘त्या’ प्रकारानंतर धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला पण….

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पक्षाशी गद्दारी केल्या प्रकरणी बीड जिल्हा परिषदेच्या 6 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना दिलासा मिळालाय.

मात्र, आता सदस्यत्व रद्द झाल्यानंतर ग्रामविकास खात्याकडे अपील केली जाणारये.

ग्रामविकास खाते भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे असल्याने ग्रामविकास खात्याकडून धनंजय मुंडे यांच्या हाती काय लागणार या चर्चेला उधाण आलंय.

बीड जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधे पक्षासोबत गद्दारी करुन भाजपला मतदान करणारे सुरेश धस गटाचे 5 व जयदत्त क्षीरसागर गटाचा 1 अशा 6 जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना धक्का बसलाय.

मात्र, आता याचा निकाल ग्रामविकास खात्याकडे म्हणजे पंकजा मुंडे यांच्याकडे जाणार आहे यामुळे या सदस्यांचे सदस्यत्व रद्द इतक्यात होईलच याची शक्यता कमी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number