साईदर्शनाने नववर्षाचा आरंभ करण्यासाठी भाविकांची झुंबड

सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षांचं स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भाविकांनी साईंचं मुखदर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांना मोठी कसरत करावी लागली. नवीन वर्षाची सुरुवात साई बाबाच्या सानिध्यात घालवताना भजन-किर्तनात साईभक्त तल्लीन होताना दिसले. बालगोपाळ, वृद्ध आणि तरूणाई अशा सर्वच वयोगटातील भाविकांची […]

साईदर्शनाने नववर्षाचा आरंभ करण्यासाठी भाविकांची झुंबड

सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षांचं स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भाविकांनी साईंचं मुखदर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांना मोठी कसरत करावी लागली.

नवीन वर्षाची सुरुवात साई बाबाच्या सानिध्यात घालवताना भजन-किर्तनात साईभक्त तल्लीन होताना दिसले. बालगोपाळ, वृद्ध आणि तरूणाई अशा सर्वच वयोगटातील भाविकांची मांदियाळी साईदर्शनासाठी जमा झाली.

बरोबर रात्री 12 वाजता साई बाबांचं दर्शन घ्यावं या उद्देशाने भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक होते. ज्यांना मंदिरात प्रवेश करता आला नाही त्यांनी मुखदर्शन आणि साई समाधी मंदिराच्या कळसाचं दर्शन घेत धन्यता मानली.

मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवल्याने लाखो भाविकांना रात्रीही दर्शन घेता आलं.

तासनतास रांगेत उभ राहात भाविकांनी नविन वर्षात सुखशांती आणि स्वास्थ्यासाठी साईबाबांना साकडं घातलं. साईबाबा संस्थानानेही नववर्षाचं स्वागत करताना साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरूस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवलंय.

मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आलीय.

रात्री 12 वाजता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यान सुरक्षारक्षकांची एकच तारांबळ उडाली.

साईनामाचा जयघोष करत भक्तांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

मिठाई वाटून सरत्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाच स्वागत करत भाविकांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.

नवीन वर्षाच्या स्वगतासाठी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या प्रत्येक भाविकाला बाबांचे दर्शन मिळवे यासाठी साई संस्थानच्या वतीने आज रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्यात आलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number