अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात भाविकांची मांदियाळी, बाप्पाला 11 हजार आंब्यांचा नैवेद्य

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची गर्दी उसळली आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात भाविकांची मांदियाळी, बाप्पाला 11 हजार आंब्यांचा नैवेद्य

पुणे: अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची गर्दी उसळली आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून, भाविक मोठ्या भक्तिभावाने ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात दर्शनासाठी येत आहेत. मंदिरात खास ‘आंबा महोत्सवाचे आयोजन' करण्यात आले असून, गणपती बाप्पाला तब्बल 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी व आंब्यांनी सजवण्यात आले आहे, ज्यामुळे वातावरण अत्यंत भक्तिमय झाले आहे. 

अक्षय्य तृतीया हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले पूजन, दान आणि धार्मिक कार्य अक्षय फल देतात, असा समज आहे. म्हणूनच हजारो पुणेकर दरवर्षी या दिवशी दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. यंदा मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी चोख व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे अनेक भाविकांनी फळं, धान्य आणि वस्त्रदान करत अक्षय तृतीयेला पुण्य मिळवण्यासाठी आपापल्या श्रद्धेनुसार मोठ्या संख्येने सहभाग दाखवला आहे. 

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पुणे पोलिसांनी शहरातील वाहतुकीत आवश्यक ते बदल केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता आणि लक्ष्मी रस्ता या भागांतून सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत PMPL बस व दुचाकींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून, पोलिसांकडून सुस्पष्ट मार्गदर्शनाचे फलकही लावण्यात आले आहेत. PMPL बस सेवा या काळात पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांना कोणतीही अडचण जाणवू नये. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number