Marbat Festival 2026 : ‘ईडा-पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत…’; काळ्या पिवळ्या मारबत मिरवणुकीसाठी लोटला जनसागर

नागपूर : नागपुरात शतकानुशतके जुना ‘मारबत’ उत्सव साजरा केला जातो. ही भाद्रपद महिन्यात दरवर्षी आयोजित केली जाणारी एक अद्वितीय सांस्कृतिक परंपरा आहे. गेल्या 145 वर्षांपासून नागपूरमध्ये मारतब उत्सव साजरा होत आहे. यंदाही या उत्सवाला भाविकांनी अलोट गर्दी केली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील हा उत्सव पाहाण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले. तसेच सिनेसृष्टीतील काही कलाकारांनीही यावेळी उपस्थित […]

Marbat Festival 2026 : ‘ईडा-पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत…’; काळ्या पिवळ्या मारबत मिरवणुकीसाठी लोटला जनसागर

नागपूर : नागपुरात शतकानुशतके जुना ‘मारबत’ उत्सव साजरा केला जातो. ही भाद्रपद महिन्यात दरवर्षी आयोजित केली जाणारी एक अद्वितीय सांस्कृतिक परंपरा आहे. गेल्या 145 वर्षांपासून नागपूरमध्ये मारतब उत्सव साजरा होत आहे. यंदाही या उत्सवाला भाविकांनी अलोट गर्दी केली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील हा उत्सव पाहाण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले. तसेच सिनेसृष्टीतील काही कलाकारांनीही यावेळी उपस्थित राहून मारतब उत्सवाचा आनंद लुटला.

हेही वाचा : Mantralay: मंत्रालयातील नियमबाह्य नियुक्तींवर मुख्यमंत्री कार्यालयाचा दणका; 570 कर्मचाऱ्यांना मूळ विभागात पाठवले, मंत्र्यांमध्ये नाराजी; कारण काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मारतब उत्सवाला उपस्थिती 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, समाजातील इडा पिडा जावी यासाठी या उत्सवाचं आयोजन करण्यात येत असते. या जुन्या परंपरेला पर्यटनाचा स्वरूप मिळून जगातील लोकांना ही परंपरा समजावी या दृष्टीने महानगरपालिकेने यावेळी चांगली प्रसिद्धी केली. यंदा विदेशी पाहुण्यांना बोलावलं. ग्लोबल फेस्टिवल करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला. त्यांचं सर्वाच अभिनंदन. महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या जीवनात असणाऱ्या सर्व इडा पिडा जाव्या, सर्वात आधी दुष्काळाची पिडा जावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनाही त्यामध्ये स्वारस्य निर्माण झाला याचा मला आनंद आहे. आलेली पाहुणे मंडळी त्यांच्या देशाचे अ‍ॅबेसेडर आहेत. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे देखील ते अ‍ॅबेसेडर आहेत. त्याला ग्लोबल ट्रेडिंग करतील, असा मला विश्वास. या संदर्भात काल मीटिंग करून सर्व विषयावर सकारात्मकतेने सरकारने भूमिका घेतली आहे. आता काही लोकं क्रेडिट घेण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी विद्यार्थ्याऐवजी आपल्याला राजकीय पोळी भाजता येईल का?, अशा पद्धतीने काम करत आहे. मात्र कोणाला राजकीय पोळी भाजता येणार नाही. दरम्यान, एमपीएससी परीक्षेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभे राहून जे लोक परीक्षेत गडबड करत आहेत. त्यांना जेरबंद केलं आणि पुढे देखील करू. ट्रान्सपरंट परीक्षा पद्धती आम्ही आणू. माझी अपेक्षा आहे. तर जरांगेंच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जे कोणी असतील ते कधी हिंदूंच्या सणांमध्ये आणि गणपतीमध्ये विघ्न आणणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number