देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सत्तांतरापूर्वी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि भाजपमधील जवळीक वाढली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंसोबत होणारी भेट महत्वाची मानली जाते. गेल्या काही […]

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सत्तांतरापूर्वी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि भाजपमधील जवळीक वाढली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंसोबत होणारी भेट महत्वाची मानली जाते.

गेल्या काही काळापासून मनसे आणि भाजपमधील जवळीक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा, विधानपरिष, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेच्या आमदाराने भाजपला साथ दिली होती. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज ठाकरे यांचे जाहीर आभार मानले होते. तसेच आपण लवकर त्यांची भेट घेऊन आभार मानू, असेही म्हटले होते. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत. आता या भेटीत काही महत्त्वाची चर्चा होऊन राजकीय नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 एकनाथ शिंदे यांनीही बंड केल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. तर मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे हे नेहमीच परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. मात्र, आता शिवसेना खिळखिळी झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये मनसे याचा फायदा घेऊन आपला विस्तार करणार का, हे पाहावे लागेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number