‘माझा आवाज बसला तरी भाजपचा आवाज कोणी दाबू शकत नाही’- देवेंद्र फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही तिरंगा रॅली काढली. या रॅलीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं झाला . यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. माझा आवाज बसला असला तरी भाजपचा आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणाच्यात इतकी ताकद नाही. विरोधकांची संविधान बचाव रॅली नाही, तर पक्ष बचाव रॅली आहे, असंही मुख्यमंत्री […]

‘माझा आवाज बसला तरी भाजपचा आवाज कोणी दाबू शकत नाही’- देवेंद्र फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही तिरंगा रॅली काढली. या रॅलीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं झाला . यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. माझा आवाज बसला असला तरी भाजपचा आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणाच्यात इतकी ताकद नाही. विरोधकांची संविधान बचाव रॅली नाही, तर पक्ष बचाव रॅली आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबईतील विकास भाजपमुळे, भाजप गरिबांचा विकासासाठी काम करणारा पक्ष, त्यांच्या घरांसाठी भाजपने प्रयत्न केले. संविधानात इतकी ताकद आहे की, त्याच्याशी कोणी छेडछाड करू शकत नाही. संविधानानं लोकशाही जिवंत ठेवली, विरोधकांनी पक्ष बचाव रॅली काढली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number