अत्यंत साधेपणाने फडणवीसांचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. फडणवीस यांनी अत्यंत साधेपणाने त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

अत्यंत साधेपणाने फडणवीसांचा वाढदिवस साजरा

२२ जुलै, २०२४ मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. फडणवीस यांनी अत्यंत साधेपणाने त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. 
सुहित जीवन ट्रस्ट पेण येथे दिव्यांग मुलांची शाळा आहे. येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आग्रह केला असता, त्याला फडणवीसांनी तत्काळ प्रतिसाद दिला. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला. 'फडणवीस हे सातत्याने दिव्यांगाच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेतात, आमच्या संस्थेला सुद्धा त्यांनी मोठी मदत केली', असे सांगत या मुलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचा आग्रह धरला होता. या विद्यार्थ्यांच्या विनंतीला फडणवीस यांनी मान देत त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे आभार मानले आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number