तोंडाच्या वाफेवर रेल्वेचे इंजिन चालत नाही – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते प्रचारसभा घेत आहेत. महाराष्ट्रातील चौथा आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण मतदारसंघातील उमेदवार आणि विद्यामान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ डोंबिवली येथे सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. तोंडाच्या वाफेवर रेल्वेचे इंजिन चालत नाही अशी बोचरी टीका केली. […]

तोंडाच्या वाफेवर रेल्वेचे इंजिन चालत नाही – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते प्रचारसभा घेत आहेत. महाराष्ट्रातील चौथा आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण मतदारसंघातील उमेदवार आणि विद्यामान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ डोंबिवली येथे सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. तोंडाच्या वाफेवर रेल्वेचे इंजिन चालत नाही अशी बोचरी टीका केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या विजय संकल्प सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते.

तोंडाच्या वाफेवर रेल्वेचे इंडिन चालत नाही तर त्यासाठी ताकद लागते अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

तसेच राहुल गांधी आणि शरद पवार यांची भाषणं निव्वळ करमणूक झाली आहेत.

त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी वक्ते नसल्याने वक्तेदेखील भाड्याने घेतले असं नाव न घेता राज ठाकरेंवर टोला लगावला.

दररोज व्हिडीओ दाखवण्यात येत असून इंटरनेटवर व्हिडीओ शोधतात असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा जाहीरनामा कोंबड्या विकण्याचा धंदा असून सामन्य जनतेचा विकास होणार नाही असेही त्यांनी म्हटलं.

मोदींमुळे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.

 

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number