Devendra Fadanvis on TET Paper Leak: TET प्रकरणात सरकार अ‍ॅक्शन मोडवर; मुख्यमंत्री फडणवीस यांचे कठोर आदेश, SIT गठित करून चौकशी सुरू

पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Devendra Fadanvis on TET Paper Leak: TET प्रकरणात सरकार अ‍ॅक्शन मोडवर; मुख्यमंत्री फडणवीस यांचे कठोर आदेश, SIT गठित करून चौकशी सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी TET प्रकरणात कठोर भूमिका घेत सरकारला थेट अ‍ॅक्शन मोडमध्ये आणले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ठाण्याचे जॉईंट पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत थेट पोलिस महासंचालकांशी संपर्क साधत कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या तपासात कोणालाही सूट दिली जाणार नाही, तसेच कुणाचीही गय केली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा – TET Exam Postponed: TET पेपरफुटी प्रकरणात हरियाणा आणि बिहार कनेक्शन उघड; 1.5 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशीही फोनवरून संवाद साधला असून, संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत आहे. सरकारने या प्रकरणात पारदर्शक आणि जलद तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.

TET प्रकरणातील अनियमितता आणि संभाव्य गैरव्यवहार समोर आल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलली असून, SIT मार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. या तपासानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number