Deva Bhau Taxi Mumbai: महायुती सरकारची मोठी घोषणा; ‘देवाभाऊ टॅक्सी’ सेवा लवकरच मुंबईत, काय होणार फायदा?

राज्य सरकारकडून कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी या सेवा सुरू करण्याची योजना पुढे येत आहे.

Deva Bhau Taxi Mumbai: महायुती सरकारची मोठी घोषणा; ‘देवाभाऊ टॅक्सी’ सेवा लवकरच मुंबईत, काय होणार फायदा?

मुंबई आणि उपनगरांमध्ये ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या खासगी कॅब सेवांनी आपला मोठा प्रभाव निर्माण केला आहे. परंतु या कंपन्यांच्या कमिशन धोरणामुळे चालक आणि वाहनमालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारकडून कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी या सेवा सुरू करण्याची योजना पुढे येत आहे.

 भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ही देवाभाऊ टॅक्सी सेवा लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत बैठक घेऊन तिला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आजच धोरण निश्चित केल्याचे सांगण्यात आले आहे. 

सर्व आवश्यक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली असून लवकरच  'देवाभाऊ सहकार टॅक्सी' मुंबई आणि एमएमआरडीए परिसरात सुरू होणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

या टॅक्सी सेवेमुळे ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या कंपन्यांकडून आकारले जाणारे मोठे कमिशन कमी होणार असून, नफा थेट चालक आणि वाहनमालकांच्या हाती जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना अधिक चांगली सेवा मिळेल असा दावा करण्यात येत आहे. तसेच चालकांसाठीही ही योजना फायदेशीर ठरणार असून नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 2 ते 5 हजार वाहने एमएमआरडीए परिसरात उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number