Ladki Bahin Yojna : e-KYC करूनही पैसे नाहीत! शेकडो ‘लाडक्या बहिणी’ चिडल्या; महिला-बाल विकास केंद्रात घातला मोठा गोंधळ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता लाडकी बहीण योजनेवरून जळगावमध्ये महिलांचा मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Ladki Bahin Yojna : e-KYC करूनही पैसे नाहीत! शेकडो ‘लाडक्या बहिणी’ चिडल्या; महिला-बाल विकास केंद्रात घातला मोठा गोंधळ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेसाठी काही निकष ठेवण्यात आली आहे. तसेच आता निकषांची अंमलबजावणी कठोरपणे केली जात आहे. राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या ई-केवायसीसाठी तारीखही वाढवण्यात आली होती. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेवरून जळगावमध्ये महिलांचा मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा- Train Delay Compensation : रेल्वे उशीरा आली अन् एका मुलीचं ‘डॉक्टर’ होण्याचं स्वप्न भंगल; 8 वर्षांनंतर रेल्वेला बसला 9.10 लाखांचा दणका
लाडकी  बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने शिकडो संतप्त  महिला ,जळगाव च्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात घुसल्या असून,लवकरात लवकर आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाखाहून अधिक महिला या लाडक्या बहीण योजनेस पात्र ठरल्या आहेत. मात्र केवायसी केल्यानंतर एक लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने,या महिलांचा आज उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केवायसी करताना झालेल्या चुकांमुळे ही अडचण निर्माण झाल्याचं अधिकारी सांगत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number