डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात निमलष्करी दलाचे जवान आणि पोलिसांचे सर्च ऑपरेशन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   हरियाणामधील सिरसा येथील राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात निमलष्करी दलाचे जवान आणि पोलिसांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली.   सर्च ऑपरेशनमध्ये 41 निमलष्करी, चार लष्कर जवानांच्या तुकड्या तसंच चार जिल्ह्यांची पोलीस फौज आणि एक डॉग स्क्वॉड सामील आहे.   अधिका-यांनी आपल्यासोबत 10 लोहारदेखील नेले आहेत. जवानांच्या मदतीसाठी डेरा मुख्यालयाच्या बाहेर बॉम्ब […]

डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात निमलष्करी दलाचे जवान आणि पोलिसांचे सर्च ऑपरेशन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

हरियाणामधील सिरसा येथील राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात निमलष्करी दलाचे जवान आणि पोलिसांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली.

 

सर्च ऑपरेशनमध्ये 41 निमलष्करी, चार लष्कर जवानांच्या तुकड्या तसंच चार जिल्ह्यांची पोलीस फौज आणि एक डॉग स्क्वॉड सामील आहे.

 

अधिका-यांनी आपल्यासोबत 10 लोहारदेखील नेले आहेत. जवानांच्या मदतीसाठी डेरा मुख्यालयाच्या बाहेर बॉम्ब स्क्वॉडदेखील तैनात आहे.

 

पंजाब आणि हरियाणा न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु असलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाटी सिरसा आणि आसपासच्या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number