सुशांतच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

मुंबई, २९ जून २०२३, प्रतिनिधी : जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडला. यानंतर सुशांतने आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात होता. मात्र त्याची हत्या झाल्याचा संशय चाहत्यांनी व्यक्त केला. हळू हळू हा विषय इतका चिघळला की त्यानंतर सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयकडे हे […]

सुशांतच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

मुंबई, २९ जून २०२३, प्रतिनिधी : जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडला. यानंतर सुशांतने आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात होता. मात्र त्याची हत्या झाल्याचा संशय चाहत्यांनी व्यक्त केला. हळू हळू हा विषय इतका चिघळला की त्यानंतर सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयकडे हे प्रकरण आल्यानंतर त्यात विशेष काही प्रगती झाल्याचं पहायला मिळालं नाही. परंतु अलीकडेच एका मुलाखतीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकादा चर्चांना उधाण आले आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणावर मोठे वक्तव्य केले. यावेळी ते म्हणाले, “सुरुवातीला सुशांतच्या प्रकरणात कोणते ठोस पुरावे नव्हते. जी काही माहिती उपलब्ध होती की केवळ इकडून तिकडून मिळालेली माहिती होती. त्यानंतर काही लोकांनी त्यांच्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केला. या लोकांशी संपर्क साधला गेला आणि पोलिसांकडे ते पुरावे सादर करण्यास त्यांना सांगण्यात आलं. या लोकांनी सादर केलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता तपासली जात आहे. हे पुरावे विश्वासार्ह असतील तर त्याआधारे पुढील कारवाई नक्कीच केली जाईल. मात्र आता मी त्याबद्दल काहीही बोलणं घाईचं ठरेल. योग्य वेळी मी त्यासंदर्भात बोलेन.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number