शिंदे गट खासदारांच्या लोकसभा अध्यक्षांकडे मागण्या

 शिवसेनेतील १२ खासदार हे आता शिंदे गटात सहभागी झाले असून आपल्या गटाची काय भूमिका आहे हे देखील त्यांच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर लागलीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचा विश्वासही या खासदारांनी व्यक्त केला […]

शिंदे गट खासदारांच्या लोकसभा अध्यक्षांकडे मागण्या

 शिवसेनेतील १२ खासदार हे आता शिंदे गटात सहभागी झाले असून आपल्या गटाची काय भूमिका आहे हे देखील त्यांच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर लागलीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचा विश्वासही या खासदारांनी व्यक्त केला आहे. स्वतंत्र गटासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्याची मागणी देखील लवकरच होईल असा त्यांना विश्वास आहे. यासंदर्भात १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खासदारांनी पुढची रणनिती ठरविल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करीत शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन तीन मागण्या केल्या आहेत. यामध्ये राहुल शेवाळे यांना लोकसभेचे गटनेते करा, संसद भवनामध्ये नवीन कक्ष कार्यालय या गटाला द्यावे तसेच पक्षप्रतोद म्हणून भावना गवळी यांच्या नावाचे पत्र दिले आहे. त्यालाही लोकसभा अध्यक्षांनी मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number