Gold Theft Crime : सोने चोरीचा धक्कादायक प्रकार उघड; गोल्ड लोनची 15 खाती पाहून पोलिसही चक्रावले, 2 किलो सोनं अन् 1 लाखांची रोकड जप्त

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोना हिने चोरीच्या सोन्यावर तारण ठेवून सुमारे 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

Gold Theft Crime : सोने चोरीचा धक्कादायक प्रकार उघड; गोल्ड लोनची 15 खाती पाहून पोलिसही चक्रावले, 2 किलो सोनं अन् 1 लाखांची रोकड जप्त

दिल्लीमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि चलाखीने चोरी करणाऱ्या ‘सोना’ या महिला चोराला अखेर दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 45 वर्षीय ही सराईत गुन्हेगार इतक्या सफाईने चोरी करत होती की तिच्यावर सहज संशय येणे कठीण होते. मात्र पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर तिला अखेर अटक करण्यात यश आले. विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यात ती रजईमध्ये लपून बसलेली असताना पोलिसांनी तिला शोधून काढले.

सोना ही चोरी करण्यासाठी अत्यंत हुशार युक्त्या वापरत होती. ती चोरी केलेले सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवून कर्ज घेत असे. पोलिस तिच्या घरापर्यंत पोहोचू नयेत म्हणून तिने घरात धोकादायक कुत्रे पाळले होते. या कुत्र्यांच्या भीतीमुळे परिसरातील कोणीही तिच्या घरात जाण्याचे धाडस करत नव्हते.

आरोपीने पोलिसांना अडवण्यासाठी पिटबुल, अमेरिकन बुली आणि परदेशी जातीचे आक्रमक कुत्रे ठेवून घराला जणू छावणीचे रूप दिले होते. मात्र पोलिसांनी धाडसी कारवाई करत या सर्व अडथळ्यांवर मात केली. छापेमारीदरम्यान मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर आरोपीला रजईत लपलेल्या अवस्थेत पकडण्यात आले.

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोना हिने चोरीच्या सोन्यावर तारण ठेवून सुमारे 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तपासादरम्यान तिचे तब्बल 15 गोल्ड लोन खाते असल्याचे उघड झाले असून, ती विविध आर्थिक संस्थांमध्ये चोरीचा माल गहाण ठेवत होती. सध्या तिची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

हेही वाचा: Petrol Diesel Rate Update: केंद्र सरकारचा इंधनावरील कराबाबत मोठा निर्णय; 1 मे पासून डिझेल निर्यातीवरील कर घटवला, पाहा काय आहेत नवे दर

पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून 1 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच मुथूट फिनकॉर्प, मुथूट फायनान्स आणि फेडरल बँक या संस्थांमध्ये सुमारे 2 किलो सोन्याचे दागिने आढळले आहेत. हे सर्व दागिने चोरीचे असल्याचा संशय असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे.

ही संपूर्ण घटना दिल्लीतील शालीमार बाग परिसरातील एका घरात झालेल्या चोरीपासून उघडकीस आली. 19 एप्रिल 2026 रोजी विजय पाल गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

या प्रकरणात आरोपीने पोलिसांपासून बचाव करण्यासाठी विविध युक्त्या आखल्या होत्या, मात्र पोलिसांच्या धाडसी आणि सूक्ष्म तपासामुळे तिचा खेळ संपुष्टात आला. सध्या तिच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू असून, चोरीचा उर्वरित माल परत मिळवण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. 

हेही वाचा: MP Hemant Savara : भाजप खासदाराच्या गाडीला भीषण अपघात; घोडबंदर रोडवर डंपरने फॉर्च्युनरला उडवलं

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number