Delhi Terrorist Attack Alert: राजधानी दिल्लीत दहशतीचे सावट! आत्मघाती हल्ल्याच्या धोक्यानंतर हाय अलर्ट जारी; भाजप मुख्यालयासह ‘या’ ठिकाणांची सुरक्षा वाढवली

देशाची राजधानी दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने संपूर्ण शहरात 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Delhi Terrorist Attack Alert: राजधानी दिल्लीत दहशतीचे सावट! आत्मघाती हल्ल्याच्या धोक्यानंतर हाय अलर्ट जारी; भाजप मुख्यालयासह ‘या’ ठिकाणांची सुरक्षा वाढवली

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचे काळे ढग जमा झाले आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनंतर दिल्लीत ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला असून, दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर पाळत ठेवायला सुरुवात केली आहे. संशयास्पद हालचाली, बेवारस वस्तू आणि गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

आत्मघाती हल्ला आणि आयईडीचा धोका

सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मध्य दिल्लीतील अत्यंत महत्त्वाच्या कार्यालयांना आणि वर्दळीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. यामध्ये आत्मघाती हल्ले, गाड्यांमध्ये लपवलेले आयईडी (IED) स्फोटक, अंदाधुंद गोळीबार आणि समन्वित दहशतवादी हल्ल्यांचा समावेश असू शकतो. या गंभीर इशाऱ्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी कोणतीही कसर न सोडता संपूर्ण शहरात तपासणी मोहिमेचा वेग वाढवला आहे.

भाजप मुख्यालयाला सुरक्षा कवच

दीनदयाल उपाध्याय (DDU) मार्गावरील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) मुख्यालय आणि आसपासच्या सरकारी कार्यालयांभोवती सुरक्षेचा वेढा अधिक घट्ट करण्यात आला आहे. या भागात सशस्त्र जवान तैनात करण्यात आले असून ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक आणि क्विक रिअ‍ॅक्शन टीम्स (QRT) यांना 24 तास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Kharghar Crime: ‘गोल्डनमॅन’ला जिवलग मित्राचाच दगा! सोन्याच्या हव्यासापोटी सिनेस्टाईल दरोड्याचा कट; खारघरमधील धक्कादायक प्रकार उघड

लाल किल्ल्याच्या घटनेमुळे यंत्रणा सतर्क

गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात 15 जणांचा बळी गेला होता, तर 20 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. 2011 नंतर दिल्लीत झालेला हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी पोलीस आता अधिक सावध भूमिकेत आहेत. शहरातील प्रत्येक हालचालीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

स्थानिक पोलिसांनी विविध वस्त्यांमध्ये आणि संवेदनशील भागांमध्ये विशेष पडताळणी मोहीम सुरू केली आहे. कोणाचेही चारित्र्य पडताळणी किंवा रँडम चेकिंग यांसारखे उपक्रम राबवून सुरक्षा सुनिश्चित केली जात आहे. दिल्ली अग्निशमन दलालाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद वस्तूची किंवा व्यक्तीची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

हेही वाचा: Vaibhav Suryavanshi: विराट विक्रम! वैभव सूर्यवंशीचा क्रिकेट विश्वात धमाका; पोलार्ड-करणबीरला मागे टाकत रचला ‘हा’ मोठा जागतिक इतिहास

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number