जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी मुलखाचा आवाज दिल्लीत सुध्दा घुमला. महाराष्ट्र सदनमध्ये शिवजन्मकाळ सोहळा झाल्यानंतर निघालेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण दिल्लीचे लक्ष वेधून घेतले.
मल्ल खांबपासून वारकरी ते आत्ताच्या ढोल-पथकापर्यंत सगळ्यांचाच आवाज दिल्लीत घुमला. या शोभयात्रेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, हंसराज अहिर, महादेव जानकर यांनी देखील सहभाग घेतला.
या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या रामदास आठवलेंनी मात्र काँग्रेसच्या काळात असं काही कुणालाही सुचलं नसल्याचा आरोप केलाय.