देहू संस्थान अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर

जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या देहू देवस्थान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचा कार्यकाळ संपल्याने, देहू संस्थान अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झालीय, अध्यक्ष पदासाठी पुरुषोत्तम महाराज मोरे आणि उमेश महाराज मोरे यांच्यात ही थेट लढत असल्याचं चित्र आहे. तर, देहू संस्थांनचं अध्यक्ष पद कोणाला मिळतं याकडे सर्व देहूकरांचे लक्ष लागले आहे. येत्या २६ मार्च […]

देहू संस्थान अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर

जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या देहू देवस्थान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचा कार्यकाळ संपल्याने, देहू संस्थान अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झालीय, अध्यक्ष पदासाठी पुरुषोत्तम महाराज मोरे आणि उमेश महाराज मोरे यांच्यात ही थेट लढत असल्याचं चित्र आहे. तर, देहू संस्थांनचं अध्यक्ष पद कोणाला मिळतं याकडे सर्व देहूकरांचे लक्ष लागले आहे. येत्या २६ मार्च ला मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी नवनिर्वाचित अध्यक्ष कोण याचा निकाल लागणार आहे. अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे बघावं लागणार. देहू संस्थानवर संत तुकाराम महाराजांचे वंशज मोरे कुटुंबियांन पैकी एकाची अध्यक्ष पदासाठी वर्णी लागते, ही निवड दोन वर्षाकरीता असते.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीची देहूकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number