राज्य मंत्रिमंडळात घेतले ‘हे’ निर्णय

महाराष्ट्र, १६ मे २०२३, प्रतिनिधी : मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक, अवकाश आणि संरक्षण धोरणांना मुदतवाढ देण्यात आली असल्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात […]

राज्य मंत्रिमंडळात घेतले ‘हे’ निर्णय

महाराष्ट्र, १६ मे २०२३, प्रतिनिधी : मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक, अवकाश आणि संरक्षण धोरणांना मुदतवाढ देण्यात आली असल्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळातील निर्णय

  • आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजगता विभागातील कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये करण्यात आले आहे.

  • अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

  • इलेट्रॉनिक्स, अवकाश आणि संरक्षण धोरणांना मुदतवाढ करण्यात आली आहे.

  • मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण आमलात आणण्यात येणार आहे.

  • राज्याला ऐन उन्हाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं. त्यामुळे राज्यातील सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आला असून नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number