मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या अपघातात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी विधानं केली आहेत. तर, या अपघातातील मृतदेहांची ओळख पटत नसल्याने मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरहून पुण्याकडे येणाऱ्या एका खाजगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर […]

मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या अपघातात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी विधानं केली आहेत. तर, या अपघातातील मृतदेहांची ओळख पटत नसल्याने मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूरहून पुण्याकडे येणाऱ्या एका खाजगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर बसचा स्फोट झाला आणि प्रवाशांचा कोळसा झाला. बुलढाण्यातील ही दुर्घटना बसचा टायर फुटल्याने झाली नसून हा अपघात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याचा अहवाल नागपूर परिवहन विभागाने दिला आहे.

मृत झालेल्या प्रवाशांची नावं कळली असली तरी कोणता मृतदेह कुणाचा, हे ओळखणं अवघड झालेलं आहे. तिकिट बुकिंग करतांना केवळ नाव आणि मोबाईल नंबर दिल्याने माहिती घेण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. त्यामुळे मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number