उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचा संदेश आला असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत यांनी याबाबत फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत. दिल्ली में मिल तुझे एके 47 से उडा देंगे, अशी धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. दरम्यान, या धमकीनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून दिल्लीतील पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्याप्रमाणे हत्या करण्याचा उल्लेख करणारा धमकीचा संदेश आला आहे. हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू असा उल्लेख मॅसेजमध्ये करण्यात आला आहे. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू. मुसेवाला टाईपमध्ये मारु. लॅारेन्सकडून तुला हा संदेश आहे. सलमान आणि तू फिक्स आहेस, तयारी करून ठेव. त्याचप्रमाणे अश्लील शिवीगाळ करत हा मॅसेज राऊत यांना पाठवण्यात आला आहे. दरम्यान राऊत यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांचे तपास कार्य सुरू आहे.
या टेक्स्ट मेसेजमध्ये राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या पंजाबमधील खतरनाक गँगगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. तसेच या मेसेजमध्ये सलमान खानच्या नावाचाही उल्लेख आहे.