Mumbai Mayor Bomb Threat: पुण्यापाठोपाठ मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; गाडी आणि केबिन बॉम्बने उडवण्याचा ई-मेल

अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या या ई-मेलमध्ये महापौरांचे शासकीय कार्यालय (केबिन) आणि त्यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी देण्यात आली आहे.

Mumbai Mayor Bomb Threat: पुण्यापाठोपाठ मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; गाडी आणि केबिन बॉम्बने उडवण्याचा ई-मेल

Mumbai Mayor Bomb Threat: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना लक्ष्य करणारा एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक ई-मेल समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या या ई-मेलमध्ये महापौरांचे शासकीय कार्यालय (केबिन) आणि त्यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. या गंभीर प्रकारामुळे मुंबई महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे.

पुणे महापालिकेच्या धर्तीवरच मुंबईतही धमकीचे सत्र
विशेष म्हणजे, आज पुणे महानगरपालिका आणि पुण्याच्या महापौर कार्यालयालाही अशाच प्रकारे ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पुण्याची ही घटना ताजी असतानाच, आता मुंबईच्या महापौरांना अशाच स्वरूपाचा धमकीचा ई-मेल आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दोन्ही घटनांमागे एकाच टोळीचा हात आहे का, याचाही शोध आता घेतला जात आहे.

हेही वाचा – PMC Bomb Threat: पुणे महापालिका आणि महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ई-मेलने खळबळ

तपास यंत्रणांकडून कसून चौकशी; मुंबई पालिकेच्या सुरक्षेत वाढ
धमकीचा हा ई-मेल प्राप्त होताच तपास यंत्रणांनी तातडीने सूत्रे हलवली आहेत. हा ई-मेल नेमका कुठून आणि कोणी पाठवला, याचा आयपी (IP) ॲड्रेस शोधण्याचे काम सायबर सेल आणि तांत्रिक तज्ज्ञांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला जात असून, महापौरांच्या वैयक्तिक सुरक्षेतही मोठी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number