जय महाराष्ट्र न्यूज, अकोले
एक ३ वर्षांची मुलगी तब्बल ३ दिवस आई वडिलांच्या मृतदेहासोबत फक्त दूध पिऊन जिंवंत राहिल्याची घटना उघडकीस आलीय. अत्यंत हृदय हेलावून टाकणारी ही घटना अकोले, शिवाजीनगर परिसरात घडलीय.
प्रकाश बंदावणे आणि चित्रा रजपुत या जोडप्याचा मृतदेह शिवाजीनगर परिसरातील सार्थक बंगल्यात आढळून आला. यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडालीय.
प्रकाश बंदावणे व मयत महिला चिञा रजपुत या सार्थक या बंगल्यात काही दिवसांपासुन भाडेकरू म्हणून राहत होत्या. मयत चिञा रजपुत हीचे वडील आपली मुलगी चिञा हीस कायम फोन करत असत. माञ, तीन दिवसांपासून चिञा फोन उचलत नसल्याने व फोन उचलला गेल्यास मयत चीञा हीची तीन वर्षीय मुलगी तनिष्का ही फोन उचलत असल्याने चिञाचे वडील बाबु रजपुत यांचा संशय बळावला म्हणून त्यांनी आपली मुलगी चिञाच्या घरी धाव घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
तनिष्का घटना घडल्यानंतर घरातील फ्रीज उघडुन दुध पिल्याने व्यवस्थीत राहीली अन्यथा ही मुलगी ही वाचण्याचे चान्सेस कमी होते. माञ लहान मुलगी या अस्वथेत राहिल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
अकोले पोलिस कर्मचारी यांनी दरवाजा तोडला असता आत मध्ये प्रचंड दुर्गंधी येत होती यावेळी मयत प्रकाश बंदावणे हा फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसुन आला तर मयत चिञा रजपुत ही पलंगावर मयत अवस्थेत दिसुन आली.
माञ. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने दुर्गंधी येत होती तरीही अकोले पोलिस स्टेशनच्या सर्व कर्मचारी व वरीष्ठांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व दोन्ही ही मृतदेह अकोले ग्रामिण रूग्णालयात पाठवण्यात आला.
मृतदेहांवर शवविच्छेदनाची प्रकिया पार पडली. चिञा हीचा मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कार करण्याची वेळ अकोले पोलिसांवर आली. चिञा हिचा मृतदेह स्विकारण्यास चिञाच्या घरच्यांनी आर्थिक कुवतीमुळे असमर्थता दाखविली आहे. तीन वर्षीय तनिष्का हीला रजपुत कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.