दाऊद सरेंडर करण्यास तयार होता; प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर आरोप

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सरेंडर करण्यास तयार होता ही माहिती शरद पवार यांना माहित असून त्यांनी कोणालाच सांगितले नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांवर आरोप लावला असून त्यांनी दाऊदबाबत खुलासा करावा असेही यावेळी म्हटलं आहे. दाऊद सरेंडर […]

दाऊद सरेंडर करण्यास तयार होता; प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर आरोप

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सरेंडर करण्यास तयार होता ही माहिती शरद पवार यांना माहित असून त्यांनी कोणालाच सांगितले नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांवर आरोप लावला असून त्यांनी दाऊदबाबत खुलासा करावा असेही यावेळी म्हटलं आहे. दाऊद सरेंडर करणार होता, मात्र शरद पवारांमुळे ही संधी हुकली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

नेमका प्रकाश आंबडेकरांचा आरोप काय ?

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप लावला आहे.

राम जेठमलानी यांना दाऊद लंडनमध्ये भेटला होता.

राम जेठमलानी यांनी दाऊद सरेंडर करण्यास तयार असल्याची माहिती शरद पवारांना दिली होती.

मात्र याबाबतची माहिती शरद पवारांनी पंतप्रधानांना सांगितली होती का? असा प्रश्न उपस्थित केला.

शरद पवारांनी दाऊदला सरेंडर करण्याची संधी हुकली.

मात्र आता दाऊदला पकडण्यासाठी भीक मागावी लागत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.

शरद पवारांनी प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं तसेच या निर्णयात युपीए सरकारही सहभागी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

दाऊद सरेंडर करण्यास तयार होता तर शरद पवार यांनी न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी का करुन घेतले नाही याबाबतची माहिती द्यावी.

तसेच दाऊदबाबतचा खुलासा शरद पवारांनी करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

 

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number