फेसबुकवरील 81 हजार युजर्सची अकाऊंट्स हॅक!

डेटा लीकेज प्रकरणानंतर आता फेसबुकवरून अकाऊण्ट हॅक होत असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या प्रकारामुळे फेसबुकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत 81 हजार युजर्सची अकाऊंट्स हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. हॅकर्सद्वारे फेसबुक युजर्सची अकाऊण्ट्स हॅक केली जातात आणि त्यातील डेटा चोरी केला जातो. या डेटाचा गैरवापरही होतो. तसंच युजर्सच्या अकाऊण्टमध्ये त्यांच्या माहितीविना तसंच […]

फेसबुकवरील 81 हजार युजर्सची अकाऊंट्स हॅक!

डेटा लीकेज प्रकरणानंतर आता फेसबुकवरून अकाऊण्ट हॅक होत असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या प्रकारामुळे फेसबुकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत 81 हजार युजर्सची अकाऊंट्स हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.

हॅकर्सद्वारे फेसबुक युजर्सची अकाऊण्ट्स हॅक केली जातात आणि त्यातील डेटा चोरी केला जातो. या डेटाचा गैरवापरही होतो. तसंच युजर्सच्या अकाऊण्टमध्ये त्यांच्या माहितीविना तसंच परवानगीविना डेटा टाकला जातो. या साऱ्याची शिक्षा युजर्सना भोगावी लागतेय.

अकाऊण्टस् हॅक करून त्यातील डेटा हा परस्पर बाहेर विकला जातो. आत्तापर्यंत 81 हजार युजर्सची खाजगी माहिती विकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशिया,अमेरिका, ब्राझील या देशांतील युजर्सची अकाऊण्ट्स मोठ्या प्रमाणावर हॅक झाली आहेत. भारतीय फेसबुक युजर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांतील किती जणांची अकाऊण्ट्स हॅक झाली आहेत, याची अजून माहिती नाही.

दरम्यान, फेसबुककडून मात्र सर्व युजर्सची अकाऊंट्स सुरक्षित असल्याचं तसंच हॅकिंग न झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number