‘अंधारे वसुली करतायत’

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सभा बीडमध्ये होणार आहे. तत्पूर्वी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी शिवसेना नेते बीडमध्ये आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व शिवसेना नेता सुषमा अंधारे यांच्यामध्ये वाद झाला यावेळी आपण सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा अप्पासाहेब जाधव यांनी व्हीडीओतून केला आहे. सुषमा अंधारे या कार्यकर्त्याकडून ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळत […]

‘अंधारे वसुली करतायत’

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सभा बीडमध्ये होणार आहे. तत्पूर्वी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी शिवसेना नेते बीडमध्ये आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व शिवसेना नेता सुषमा अंधारे यांच्यामध्ये वाद झाला यावेळी आपण सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा अप्पासाहेब जाधव यांनी व्हीडीओतून केला आहे. सुषमा अंधारे या कार्यकर्त्याकडून ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला.

महाप्रबोधन सभेच्या स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांची काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची काच फोडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी शिवसैनिकांसोबत आल्या होत्या.

यावेळी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश बरेवार यांच्यात बाद झाला, यादरम्यान जाधव यांना मारहाण झाल्याचे तसेच त्यांच्या गाडीचीही तोडफोड झाल्याची चर्चा प्रारंभी होती. मात्र यानंतर जाधव यानी एक व्हीडीओ प्रसारित करून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या पदासाठी पैसे घेत असल्याचा दावा करत आपले पदही त्यांनी कोणाला तरी विकले असल्याचे म्हटले. तसेच बीडमध्ये झालेल्या यावेळी त्यांना मारल्याचेही त्यांनी व्हीडीओत म्हटले आहे. या सर्व प्रकाराने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number