जय महाराष्ट्र न्यूज, नंदूरबार
नंदूरबारपासून भाजपच्या शिवार संवाद यात्रेला सुरुवात झाली. भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेला शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं
विरोध केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दानवेंना काळे झेंडे दाखवले आणि दानवे वापस जाओच्या घोषणा दिल्या.
भाजपच्या शिवार संवाद यात्रेला शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरेंनी दिला होता. त्यानंतर दानवेंच्या नंदूरबार दौऱ्याला प्रचंड
पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला.