भीषण अपघात, गाडी थेट वाहनतळात घुसली

छत्रपती संभाजीनगर येथील निराला बाजार येथे भीषण अपघात झाला. निराला बाजार परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये एक चारचाकी गाडी सरळ घुसल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

भीषण अपघात, गाडी थेट वाहनतळात घुसली

२८ सप्टेंबर, २०२४, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील निराला बाजार येथे भीषण अपघात झाला. निराला बाजार परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये एक चारचाकी गाडी सरळ घुसल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यात ८ ते १० दुचाकी तसेच एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. निराला बाजार येथील पार्किंगच्या ठिकाणी येणाऱ्या एका चारचाकी गाडीवरचा चालकाकडून ताबा सुटल्याने गाडी थेट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींवर धडकली आहे. यात जवळपास ८ ते १० दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.  एका चारचाकीला देखील धडक बसल्याने समोरच्या बाजूने नुकसान झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात चौघे जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यावर तातडीने तिथे उपस्थित नागरिकांनी जखमी झालेल्यांची मदत केली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number