दंगल गर्लसोबत छेडछाड;सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई दंगल सिनेमाची अभिनेत्री जायरा वसीमने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विमानात आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचे तिने सांगितले.जायरा वसीमने आपल्या इनस्टाग्रामच्या पोस्टवरुन ही माहिती दिली आहे. जायरा शनिवारी नवी दिल्ली ते मुंबई असा विस्तार एअरलाइनन्सने प्रवास करत असतांना विमानात एका सहप्रवाशाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. जायराच्या म्हणण्यानुसार तिने याबाबत विमानातील […]

दंगल गर्लसोबत छेडछाड;सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दंगल सिनेमाची अभिनेत्री जायरा वसीमने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विमानात आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचे तिने सांगितले.जायरा वसीमने आपल्या इनस्टाग्रामच्या पोस्टवरुन ही माहिती दिली आहे.

जायरा शनिवारी नवी दिल्ली ते मुंबई असा विस्तार एअरलाइनन्सने प्रवास करत असतांना विमानात एका सहप्रवाशाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. जायराच्या म्हणण्यानुसार तिने याबाबत विमानातील क्रूकडे तक्रार केली होती. मात्र, फ्लाइट क्रूने तिची कोणतीही मदत केली नाही. जायराने याबाबत व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण, विमानात लाईट कमी असल्याने तिला ते जमले नाही.

पण, मुंबईत पोहोचल्यानंतर झायराने इनस्टाग्रामद्वारे लाईव्ह येतं आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ती स्वत:चे आश्रू रोखू शकली नाही. स्वतसोबत झालेल्या असभ्य वर्तनाबाबत माहिती देताना तिला रडू कोसळलं. यावेळी ती म्हणाली की विमानात एवढे सर्वजण असतांना एकही जण माझ्या मदतीला आलं नाही.  इकडे तुम्हाला स्वत:ची मदत स्वत: लाच करावी लागते. 

तर, झायराच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत विस्तारा एअरलाइनस्ने ट्विट केलंय. या संपूर्ण प्रकाराबाबत काटेकोरपणे चौकशी करण्यात येईल. खरचं झायरासोबत अशा प्रकारची घटना घडली असेल तर, योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे म्हटले त्यांनी म्हटले आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number