परतीच्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान

परतीच्या पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे

परतीच्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान

ठाणे : परतीच्या पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कापणी करून शेतात वाळायला ठेवलेल्या भातासह वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या भाताच्या ऑब्यांना पुन्हा कोम आले आहेत. त्यामुळे डोळ्यासमोर २८४ हेक्टरमधील भाताचे नुकसान होताना शेतकरी पाहात आहेत. हतबल झालेल्या जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आता आश्वासनांची खैरातही सत्ताधाऱ्यांच्या राजकीय पक्षांकडून होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. 'परतीच्या पावसाने जिल्ह्यातील भाताचे नुकसान; बळीराजा चिंतेत' या मथळ्याखाली या आधी लोकमतने १४ ऑक्टोबरला वृत्त प्रसिद्ध करून नुकसानीचे गांभीर्य उघड केले होते. जिल्ह्यात रोज संध्याकाळी परतीच्या पावसाकडून धुमाकूळ घातला जात आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number