मेळघाटात हरभरा आणि गहू पिकांचं नुकसान

मेळघाटात विशेषत: चिखलदरा तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चुरणी परिसरात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. गारपीटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सध्या गहू, हरभरा तोडणी आणि काढण्याचं काम सुरु आहे. मात्र अचानक आलेल्या अवकाळीनं अनेक शेतकऱ्यांचं गहू, हरभरा पिकांचं नुकसान झालं आहे..अवेळी पाऊस आल्यानं गहू शेतातच गळाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सध्या […]

मेळघाटात हरभरा आणि गहू पिकांचं नुकसान

मेळघाटात विशेषत: चिखलदरा तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चुरणी परिसरात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. गारपीटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सध्या गहू, हरभरा तोडणी आणि काढण्याचं काम सुरु आहे. मात्र अचानक आलेल्या अवकाळीनं अनेक शेतकऱ्यांचं गहू, हरभरा पिकांचं नुकसान झालं आहे..अवेळी पाऊस आल्यानं गहू शेतातच गळाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

सध्या गहू व हरभरा कापण्याचे काम व काढण्याचे काम सुरू आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचे गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. वादळी वारा आणि पाऊस झाल्याने गव्हाचे पीक शेतातच आडवे झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे दु:ख शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसून आले. पीक पार उद्ध्वस्त झाले आहे. शेकडो एकर शेतातील गहू व हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासह इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीमुळे मेळघाटातील शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

शुक्रवारी दिवसभर आकाशात विजेचे तांडव सुरू असल्याने शेतकर्‍यांच्या पिकाला धोका निर्माण झालेला आहे. गेले आठवडाभर मेळघाटात होळी महोत्सव व फगवा मागण्याचा पारंपरिक उपक्रम सुरू होता. रंगपंचमीनंतर मजूर शेतकामासाठी तयार झाले. मात्र, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने सगळ खेळखंडोबा केला. खरीपानंतर आता रब्बी पीकही हातचे जाणार असल्याचे दिसून येत आहे. माल ओला झाल्याने मळणी थांबली आहे, तर ज्यांची पिके उभी आहेत, ते पावसामुळे खराब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number