समीर वानखेडेंविरोधात दलित संघटना आक्रमक

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र सादर केले होते. दरम्यान दलित संघटना आक्रमक झाली असून समीर वानखेडे यांच्या विरोधात मोर्चा काढण्या आला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.   नोकरी मिळवण्यासाठी […]

समीर वानखेडेंविरोधात दलित संघटना आक्रमक

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र सादर केले होते. दरम्यान दलित संघटना आक्रमक झाली असून समीर वानखेडे यांच्या विरोधात मोर्चा काढण्या आला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

  नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेडे यांनी स्वत:ला दलित असल्याचे दाखवल्याचा दलित संघटनांनी दावा केला आहे. तसेच नोकरीत आरक्षण प्राप्तीसाठी वानखेडेंनी खोटी कागदपत्रे दाखल केली असल्याचा आरोप स्वाभीमानी रिपब्लिकन आर्मी आणि भीम आर्मीने वानखेडेंवर केला आहे. या दोन्ही संघटनांकडून जात पडताळणी समितीकडे वानखेडे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांनी जाती आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सर्व कागदपत्रे सादर केली होती. त्यात त्यांनी पहिल्या पत्नीकडून झालेल्या मुलाचा जन्मदाखला आणि पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटाची सर्व कागदपत्रे अध्यक्षांपुढे सादर केली. समीर वानखेडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असतानाच आता दलित संघटना आक्रमक झाली असून जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांची तक्रार करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number