बॉलिवूड अभिनेते दलीप ताहील रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना गाडीचा ताबा सुटून त्यांनी पुढच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांची नावे जेनिता गांधी, गौरव चुघ आहे. हे दोघे ही खारमध्ये राहणारे राहिवासी आहेत.
अभिनेते दिलीप ताहिल हे अपघात घडल्यानंतर तिथून पळ काढत होते. परंतु रविवारी गणपती विसर्जन असल्यामूळे रस्त्याला खूप गर्दी होती. त्यामुळे दलीप ताहील यांना तिथून पळ काढता आला नाही. रिक्षातील जखमी प्रवाशांनीच दलीप यांची कार अडवली. ताहील त्यांना बाहेर काढले असता ताहील जखमी प्रवाशांशी वाद घालू लागले. जखमींनी तातडीने पोलिसांना बोलावून घेतले. खार पोलीस ठाण्यातील काही पोलिस घटनास्थळी पोहचले आणि घडलेल्या प्रकरणाची चौकशी सुरू केले.
पोलिसांच्या चौकशीत दिलीप ताहिल हे मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलीप यांना अटक केले. ताहिल यांना अटक केल्यानंतर लगेच जामिनावर सोडण्यात देखील आले असं तेथील पोलिस निरीक्षकांचे म्हणणे आहेत.
अभिनेते दलीप ताहील हे उमेदीच्या काळात विमान चालवत. मात्र त्यात विशेष गती नसल्याने त्यांनी अभिनयाचा मार्ग स्वीकारला. अनेक हिंदी चित्रपट आणि इंग्रजी नाटकांत त्यांनी अभिनय केला आहे.