FMCG Products: महागाईचा आणखी एक झटका! साबण, डिटर्जंट, बिस्किटांपासून चहा-कॉफीपर्यंत सर्वच महागणार?

वाढते इंधन दर, कच्च्या मालाच्या किंमती आणि वाहतूक खर्चामुळे साबण, डिटर्जंट, बिस्किटं, चहा, कॉफी आणि पॅकेज्ड फूडसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

FMCG Products: महागाईचा आणखी एक झटका! साबण, डिटर्जंट, बिस्किटांपासून चहा-कॉफीपर्यंत सर्वच महागणार?

FMCG Products: देशात महागाईचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. साबण, डिटर्जंट, बिस्किटं, नमकीन, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेज्ड फूड यांसारख्या अनेक वस्तूंच्या किमती लवकरच वाढू शकतात. जागतिक स्तरावर वाढलेले कच्च्या तेलाचे दर, वाहतूक खर्च आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतींमुळे एफएमसीजी (FMCG) कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे कंपन्या आता उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा किंवा पॅकेटचा आकार कमी करण्याचा पर्याय निवडण्याच्या तयारीत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्याचा परिणाम थेट वाहतूक आणि उत्पादन खर्चावर होत आहे. साबण आणि डिटर्जंट तयार करण्यासाठी लागणारे पाम ऑइल आणि केमिकल्स महाग झाल्यामुळे या उत्पादनांच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि इतर साहित्याच्या किंमती वाढल्याने कंपन्यांचा खर्च आणखी वाढला आहे.

महाग होऊ शकणाऱ्या वस्तूंची यादी

  • साबण

  • डिटर्जंट पावडर

  • डिश वॉश लिक्विड

  • हँडवॉश

  • बिस्किटं

  • नमकीन

  • इंस्टंट नूडल्स

  • पॅकेज्ड फूड

  • फ्रोजन फूड

  • सॉफ्ट ड्रिंक्स

  • ज्यूस

  • चहा

  • कॉफी

विशेषतः डिश वॉश, हँडवॉश आणि घरगुती स्वच्छतेच्या उत्पादनांमध्ये 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिस्किटं आणि नमकीन बनवण्यासाठी लागणारे पीठ, साखर आणि खाद्यतेल यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे कंपन्या उत्पादनांचे वजन कमी करून जुन्याच किंमती कायम ठेवण्याचा मार्ग स्वीकारू शकतात. ग्राहकांना कमी वजनाचं पॅकेट मिळेल, पण किंमत मात्र तीच राहू शकते.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्यूसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र प्लास्टिक बाटल्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने या पेयांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. फ्रोजन फूड, इंस्टंट नूडल्स आणि इतर पॅकेज्ड खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्येही वाढ होऊ शकते. चहा आणि कॉफीच्या पॅकेट्सवर वाहतूक खर्चाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याही दरात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

एफएमसीजी कंपन्यांसमोर सध्या सर्वात मोठं आव्हान म्हणजे ग्राहक टिकवून ठेवणं आणि नफा सांभाळणं. त्यामुळे अनेक कंपन्या छोट्या किंमतींची पॅकेट्स बाजारात कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. 5, 10 आणि 20 रुपयांच्या श्रेणीतील वस्तूंना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. त्यामुळे कंपन्या किंमत वाढवण्याऐवजी वजन कमी करण्याच्या पर्यायाकडे वळत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number