Health Risk: दररोज चपाती किंवा ब्रेड खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

आपल्या दैनंदिन आहारात चपातीचा समावेश हा अगदी सामान्य आहे. पण हिच चपाती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Health Risk: दररोज चपाती किंवा ब्रेड खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Health Risk: आपल्या दैनंदिन आहारात चपातीचा समावेश हा अगदी सामान्य आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचं भोजन प्रत्येक वेळी चपाती आपल्या ताटात असतेच. पण हिच चपाती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. तज्ज्ञांच्या मते, चपाती कशी शिजवली जाते यावर तिचं आरोग्यावरचं परिणाम अवलंबून असतो.

अलीकडील काही संशोधनांमध्ये हे स्पष्ट झालं आहे की जास्त तापमानावर चपाती भाजल्यास त्यात एक्रिलामाइड नावाचं केमिकल तयार होतं. हे केमिकल डीएनएला हानी पोहोचवू शकतं आणि दीर्घकाळात कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. हेच केमिकल ब्रेड, तंदुरी रोटी किंवा जास्त करपलेले बटाटे यामध्येही आढळतं.

क्रिस्पी म्हणजे हेल्दी नाही; तज्ज्ञांची सूचना

कर्करोगतज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांच्या मते, करपलेली किंवा काळसर झालेली रोटी आणि ब्रेड आरोग्यासाठी घातक ठरू शकते. लोकांना ‘क्रिस्पी’ ब्रेड किंवा ‘तंदुरी’ चव आवडते, पण हाच भाग सर्वात धोकादायक असतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, ब्रेड किंवा चपाती फक्त गोल्डन ब्राऊन रंगाची झाल्यावरच गॅसवरून उतरवावी. काळसर झालेला भाग काढून टाकून उपयोग नाही, कारण त्यावेळी एक्रिलामाइड आधीच तयार झालेलं असतं.

संशोधन काय सांगतं?

एन्व्हायरमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, गॅसवर चपाती भाजताना नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड सारखे वायू उत्सर्जित होतात. हे वायू फुफ्फुसांवर परिणाम करतात आणि अस्थमा किंवा श्वसनविकार असलेल्या लोकांसाठी विशेषतः धोकादायक ठरू शकतात.

तसेच, न्युट्रिशन अँड कॅन्सर जर्नलच्या अहवालानुसार, जास्त तापमानावर अन्नपदार्थ शिजवल्यास त्यातील नैसर्गिक घटक रासायनिक रूप घेतात आणि शरीरात हानिकारक परिणाम निर्माण करतात.

ब्रेडविषयीही सावधानता आवश्यक

कॅन्सर सर्जन डॉ. जयेश शर्मा यांच्या मते, ब्रेड खाल्ल्यानं दोन प्रकारचा धोका संभवतो एक म्हणजे एक्रिलामाइडचा आणि दुसरा म्हणजे शर्करेचं प्रमाण वाढण्याचा. बेक केलेल्या पदार्थांमुळे शरीरात साखरेचं प्रमाण वाढून लठ्ठपणा आणि इन्फ्लेमेशन (सुज) निर्माण होतो. त्यामुळे व्हाईट किंवा ब्राऊन ब्रेडऐवजी मल्टीग्रेन ब्रेडचा वापर करावा, असं ते सुचवतात.

 चपाती भाजताना काय काळजी घ्यावी?

डॉ. शर्मा सांगतात की चपाती थेट गॅसवर भाजल्याने गॅसमधील वायू तिच्याशी मिसळतात, पण त्यातून कॅन्सर होत नाही. खरं धोका तेव्हा निर्माण होतो, जेव्हा चपातीवर काळे डाग पडतात. हे डाग म्हणजेच एक्रिलामाइडचे संकेत असतात. त्यामुळे चपाती भाजताना घाई न करता मंद आचेवर शेकावी आणि काळसर होऊ देऊ नये.

टिप्स:

  • चपाती नेहमी गोल्डन ब्राऊन रंगाची ठेवा.

  • काळे डाग पडल्यास ती चपाती टाळा.

  • गॅस कमी आचेवर वापरा.

  • तव्यावर पूर्णपणे भाजलेली चपाती अधिक सुरक्षित.

  • शक्य असल्यास स्वयंपाकघरात योग्य वायुवीजन ठेवा.

चपाती हा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे, पण तिचं योग्य प्रकारे शिजवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. करपलेली चपाती किंवा ब्रेड टाळून ‘गोल्डन ब्राऊन’ नियम पाळला, तर आरोग्य टिकवणं सोपं होईल. तज्ज्ञ म्हणतात, जीवन गोल्डन ठेवा, काळं नाही.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number