जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोर्टाच्या नियमांमुळे रया गलेल्या दहिहंडी उत्सवाला गतवैभव मिळवून देण्यासाठी गोविंदा पथक सरसावले असून, डीजे लावणाऱ्या आणि सिनेस्टार आणून दहिहंडीचं
व्यावसायिकीकरण करणाऱ्या आयोजकांकडे गोविंदा पथकांनी पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.
आयोजक आणि दहिहंडी आयोजनामुळे दहीहंडी सणाच्या अडचणीत वाढ झाल्याचा आरोप दहीहंडी समन्वय समितीने केला आहे. त्यामुळे सण वाचवण्यासाठी पैशांचं आमिष
दाखवणाऱ्या आयोजकांवरही बहिष्कार टाकण्याची तयारी असल्याचे दहिहंडी समन्वय समितीने स्पष्ट केले.
दहिहंडी पारंपरिक पद्धतीने साजरी व्हावी याकरता सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 10 तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्ट पारंपरिक सणाचे महत्व लक्षात
घेऊन योग्य निर्णय देईल असा विश्वास समन्वय समितीने व्यक्त केला आहे.