डहाणू बोट प्रकरणी, बोट मालकावर गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर डहाणूमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटल्याची घटना घडलीय. एकूण 40 विद्यार्थी या बोटीत असल्याची माहिती समोर येतेय. आतापर्यंत 32 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, तीन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सोनल सुर्ती आणि जानव्ही सुर्ती असे मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. काही विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहेत. 2 नॉटिकल […]

डहाणू बोट प्रकरणी, बोट मालकावर गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

डहाणूमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटल्याची घटना घडलीय. एकूण 40 विद्यार्थी या बोटीत असल्याची माहिती समोर येतेय. आतापर्यंत 32 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, तीन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सोनल सुर्ती आणि जानव्ही सुर्ती असे मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. काही विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहेत. 2 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडाली होती.

दरम्यान, खासगी बोट मालक पार्थ अंभिर आणि महेंद्र अंभिरेंना डहाणू पोलिसांनी अटक केलीय. दरम्यान, सेल्फीच्या नादात ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच कोस्ट गार्ड आणि हवाई वाहतुकीने शोधकार्य सुरु केले. हे सर्व विद्यार्थी पिकनिकसाठी गेले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, याप्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल कराण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number