जय महाराष्ट्र न्यूज, डहाणू
डहाणूमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटलीय. आतापर्यंत 32 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय.
40 विद्यार्थी या बोटीत असल्याची माहिती समोर येतंय. तर, तीन विद्यार्थ्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय.
सोनल सुर्ती आणि जानव्ही सुर्ती असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. तर, अजूनही काही विद्यार्थी बेपत्ता आहेत. 2 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडालीय.
घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात झालीय. मात्र, बोट उलटण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय.