गुढीपाडव्याला मंदिराबाहेरूनच दगडूशेठ गणपतीचे दर्शन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट गुढीपाडव्याला आकर्षक सजावट करते.यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर बंद असल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी बाहेरूनच दर्शनाचा लाभ घ्यावा लागणार आहे.गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराचा यावर्षी ३८ वा वर्धापन दिन आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा संगीत महोत्सव आणि इतर कार्यक्रम रद्द करण्यात […]

गुढीपाडव्याला मंदिराबाहेरूनच दगडूशेठ गणपतीचे दर्शन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट गुढीपाडव्याला आकर्षक सजावट करते.यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर बंद असल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी बाहेरूनच दर्शनाचा लाभ घ्यावा लागणार आहे.गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराचा यावर्षी ३८ वा वर्धापन दिन आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा संगीत महोत्सव आणि इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला मंदिराला आकर्षक सजावट केली जाते. तसेच भाविकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळते.यंदा मंदिराबाहेरूनच दर्शन असल्याने भाविकांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण विश्वावरचे कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना विश्वस्तांनी गणराया चरणी केली. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक कार्यक्रमदेखील पार पडले. तसेच पारंपरिक पध्दतीने गुढी उभारण्यात आली.

मंदिर बंद असले तरीही दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरु राहणार आहेत.भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय ट्रस्टने केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number