मुंबई, ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी : भारतात चित्रपटांचा पाया रचणारे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची आज जयंती. त्यांच्या कार्याचा गैरव व्हावा यासाठी त्यांना आदरांजली म्हणून चित्रपट सृष्टीत मोडाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस दादासाहेब पुरस्काराने गौरविण्यात येते.
दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात माहिती आणि प्रसारण मंत्रालयानद्वारे स्थापित चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे हा पुरस्कार सादर केला जातो. “भारतीय चित्रपटांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी केलेल्या उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यासाठी भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींची समिती नेमण्यात आली आहे. हि समिती पात्र व्यक्तींची निवड करते. या पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ पदक, एक शाल आणि रोख बक्षीस ₹10,00,000 यांचा समावेश आहे.