जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईकर सई भक्तांसाठी एक खुशखबर आहे. आता दादर वरून तुम्ही थेट शिर्डीला रेल्वेने जाऊ शकता.
लवकरच मध्य रेल्वे तर्फे दादर ते शिर्डी विषेश साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ही घोषणा केली.
उद्या सुरेश प्रभु यांच्या हस्ते शिर्डी स्थानकावर प्रवाशांच्या सोईसाठी विविध उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या गाडीची वेळ दादरहून शिर्डीसाठी दर शुक्रवारी रात्री 9.45 अशी असेल. तर, शिर्डीहुन दादरसाठी शनिवारी सकाळी 9.20 अशी असेल.