नवबौद्ध समाजाला आता मिळणार अल्पसंख्याकांसारख्याच सुविधा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यातल्या नवबौद्ध समाजाला आता अल्पसंख्यांकांसारख्याच सुविधा मिळणार आहेत.   अल्पसंख्याक समुदायासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यास नवबौद्ध पात्र असल्याचं परिपत्रक सरकारनं जाहीर केले.   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागूपरला धर्मांतर करुन अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्विकार केला. बौद्ध धर्मातल्या कोणत्याही व्यक्तीला कायदेशीररित्या केंद्र सरकारकडून अनुसुचित जातीचे लाभ मिळत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र […]

नवबौद्ध समाजाला आता मिळणार अल्पसंख्याकांसारख्याच सुविधा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातल्या नवबौद्ध समाजाला आता अल्पसंख्यांकांसारख्याच सुविधा मिळणार आहेत.

 

अल्पसंख्याक समुदायासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यास नवबौद्ध पात्र असल्याचं परिपत्रक सरकारनं जाहीर केले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागूपरला धर्मांतर करुन अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्विकार केला. बौद्ध धर्मातल्या कोणत्याही व्यक्तीला कायदेशीररित्या केंद्र सरकारकडून अनुसुचित जातीचे लाभ मिळत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं त्यांना नवबौद्ध असं संबोधून आंबेकरांच्या बौद्ध धम्म स्विकारलेल्यांना जातीचे लाभ मिळवून दिले.

 

पण, ते खऱ्या अर्थानं बौद्धच आहेत. त्यामुळे नवबौद्धांना कायदेशिररित्या बौद्धच समजणं अनिवार्य आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक म्हणून त्यांना दर्जा प्राप्त झाला असून सर्व लाभ घेण्यास पात्र असल्याचं परिपत्रक शासनानं काढले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number