BEST Bus Accident: चुकून एक्सीलेटर दाबून गाडी फिरविली? दादर बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट

दादरमधील बेस्ट बस अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे नव्हे तर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे आरटीओच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे.

BEST Bus Accident: चुकून एक्सीलेटर दाबून गाडी फिरविली? दादर बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट

मुंबईतील दादर परिसरातील वीर कोतवाल उद्यानाजवळ घडलेल्या बेस्ट बस अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमागे बसचे ब्रेक निकामी होणे कारणीभूत नसल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. आरटीओने सादर केलेल्या प्रथमदर्शनी अहवालानुसार संबंधित बसची ब्रेक यंत्रणा पूर्णपणे सुस्थितीत होती.अपघातानंतर बसच्या तांत्रिक तपासणीसाठी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सखोल पाहणी केली. या तपासणीत वाहनाच्या ब्रेक प्रणालीमध्ये कोणताही बिघाड आढळून आला नाही. त्यामुळे सुरुवातीला व्यक्त करण्यात आलेल्या ब्रेक निकामी झाल्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांच्या मते, हा अपघात मानवी चुकीमुळे घडल्याची शक्यता अधिक आहे. बस चालकाने अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीत घाबरून चुकीची कृती केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चालकाने ब्रेकऐवजी चुकून एक्सलेरेटर दाबल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि वाहनाने अनपेक्षित वळण घेत अपघात घडला असावा.या घटनेनंतर बेस्ट प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे. अपघातग्रस्त बस सध्या बेस्टच्या ताब्यात असून पुढील तांत्रिक तपासणी सुरू आहे. तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने चार सदस्यीय विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती अपघाताच्या सर्व पैलूंचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number