मुंबई, ९मे २०२३, प्रतिनिधी : समाज माध्यमांवर दर दिवशी अनेक व्हिडिओ आणि गाणी व्हायरल होत असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून एक मराठी गाणे इंस्टाग्राम रीलवर प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्यावर देश विदेशातील लोक या गाण्यावर रील्स बनवताना दिसून येत आहे. ते गाणं म्हणजे ‘दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली…’
इंस्टग्रामवर ‘दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली…’ या गाण्याचे असंख्य व्हिडिओ बनवले जात आहेत. प्रत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी या गाण्यावर रील्स बनवत आहेत. परंतू हे गाणे कोणत्या सिनेमातील आहे हे बऱ्याच लकांना अजूनही ठाऊक नाही.
काहीवेळेस चित्रपटांपेक्षा त्यातील गाणी जास्त गाजतात. यापैकी एक गाणं म्हणजे दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली, हे गाणं. मुळात या गाण्याचे मूळ नाव चोरू चोरून असे आहे.हे गाणे फतवा या चित्रपटातील आहे.