जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत होणारा मराठा मोर्चा उद्यावर येऊन ठेपला आहे. या मराठा मोर्चामध्ये राज्यभरातून मराठा समाजातील लोक सहभागी होणार आहेत.
यात मुंबईचे डबेवालेही आपला सहभाग नोंदवणार आहेत. मराठा समाजातील लोकांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
डबेवाल्यांच्या सुट्टीमुळे मात्र मुंबईकरांचे जेवणाचे हाल होणार आहेत. तर, दुसरीकडे मराठा मोर्चामुळे मध्य आणि दक्षिण मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आली.