भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या डब्बेवल्यांना दिलासा मिळाला आहे. हा निर्णय घेतल्यामुळे मुंबईच्या डब्बेवाल्यांनी सरकारचे आभार मानले आहे.
“डबेवाल्यांची आम्ही जमा करत आहोत” “हार्बर, सेंट्रल व वेस्टर्न अशी राहण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न असेल” “परवडणाऱ्या घरांच्या योजनेत डबेवाल्यांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे”, अशीही माहिती श्रीकांत भारतीय यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“आंतरराष्ट्रीय स्तराचे डबेवाला भवन बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे.” “माझ्या आमदार निधीसह विशेष प्रयत्नात हे भवन उभारणार आहोत”, असेही श्रीकांत भारतीय पत्रकार परिषदेत म्हणाले.
“घरे कोण देणार? सिडको की म्हाडा हे लवकरच ठरवले जाईल” “घरांच्या किंमती आवाक्यात ठेवल्या जातील” “घरे देताना डबेवाल्यांची नोंदणी, ओळखपत्र या गोष्टी तपासल्या जातील”, अशी माहितीही श्रीकांत भारतीय यांनी पत्रकार परिषदेत दिली.