…यांचा डी.लिट. पदवीने सन्मान

निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांना डी. लिट पदवी देण्यात आली आहे. सामाजिक कार्यातील योगदानाविषयी डॉ. सचिन धर्माधिकारी यांना ही पदवी देण्यात आली आहे. रविवारी, ५ मार्च, २०२३ रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको एक्झीबिशन सेंटर हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. राजस्थानातील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापीठातर्फे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक आणि निरुपणकार डॉ. सचिन धर्माधिकारी यांना […]

…यांचा डी.लिट. पदवीने सन्मान

निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांना डी. लिट पदवी देण्यात आली आहे. सामाजिक कार्यातील योगदानाविषयी डॉ. सचिन धर्माधिकारी यांना ही पदवी देण्यात आली आहे.

रविवारी, ५ मार्च, २०२३ रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको एक्झीबिशन सेंटर हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. राजस्थानातील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापीठातर्फे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक आणि निरुपणकार डॉ. सचिन धर्माधिकारी यांना डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्याचे अध्यक्ष पद भूषवले. या सोहळ्यास श्रीबैठकीतील एक लाखाहून अधिक श्रीसदस्य उपस्थित होते.
डॉ. सचिन धर्माधिकारी यांना यापूर्वी युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठ, फ्रान्सच्या ‘डी. लिट.’ पदवीसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
डॉ. सचिन धर्माधिकारी हे गेली अनेक वर्षे ‘महाराष्ट्रभूषण’ प्राप्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानाच्या वतीने सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे समाजाभिमुख उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाजऋणांची जाणीव ठेवून या प्रतिष्ठानांतर्गत सातत्याने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number