राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के.जैन यांची नियुक्ती

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई अनेक वरिष्ठांना डावलून, राज्याच्या मुख्य सचिवपदी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी.के.जैन यांची नियुक्ती झाली आहे. ते आज सुनील मलिक यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. सुमित मलिक निवृत्त होत असल्याने ही नियुक्ती करण्यात आली आहे.  राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा 1983 च्या बॅचमधील ज्येष्ठतेनुसार मेधा गाडगीळ, सुधीरकुमार श्रीवास्तव, दिनेश कुमार जैन,यू.पी.एस. मदान, संजीवनी कुट्टे आणि […]

राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के.जैन यांची नियुक्ती

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

अनेक वरिष्ठांना डावलून, राज्याच्या मुख्य सचिवपदी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी.के.जैन यांची नियुक्ती झाली आहे. ते आज सुनील मलिक यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. सुमित मलिक निवृत्त होत असल्याने ही नियुक्ती करण्यात आली आहे.  राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा 1983 च्या बॅचमधील ज्येष्ठतेनुसार मेधा गाडगीळ, सुधीरकुमार श्रीवास्तव, दिनेश कुमार जैन,यू.पी.एस. मदान, संजीवनी कुट्टे आणि सुनील पोरवाल यांचा समावेश आहे. मात्र, ज्येष्ठता यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले दिनेश कुमार जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

25 जानेवारी 1959 रोजी जन्मलेले डी के जैन हे मूळचे राजस्थानचे  आहे. 25 ऑगस्ट 1983 रोजी महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालेल्या जैन यांनी, एम टेक मॅकेनिक, एम बी ए अशा पदव्या मिळवल्या आहेत. डी. के. जैन यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या योजनेत चांगले काम केलेले आहे. तसेच अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचीही त्यांच्यावर मर्जी असल्याने त्यांनी जैन यांच्या नावाला पसंती दिली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number