रत्नागिरीत सिलेंडरचा स्फोट, दोघींचा मृत्यू

रत्नागिरी शहराजवळ शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत शेट्ये नगर येथील दुमजली घरावरील पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामुळे लागलेल्या आगीने मोठा आहाकार उडाला आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्फोटात कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र घरात अडकलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. […]

रत्नागिरीत सिलेंडरचा स्फोट, दोघींचा मृत्यू

रत्नागिरी शहराजवळ शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत शेट्ये नगर येथील दुमजली घरावरील पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामुळे लागलेल्या आगीने मोठा आहाकार उडाला आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्फोटात कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र घरात अडकलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हा स्फोटात दोघ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिलेंडर स्फोटानंतर घरात लागलेल्या आगीमुळं घरात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. कनीझ अशफाक काझी आणि नुरनीसा अमीर अलझी, असं मृत्यू झालेल्या महिलांचे नाव आहे. अश्फाफ अहमद काझी वय वर्षे ५२ हे आपल्या पत्नी आई आणि मुलांसह रहायाचे. ते ज्या घरात रहात होते ती एक बैठी चाळ असून घरं एकमेकांना चिकटून आहेत. पण स्फोट झाला तेव्हा रस्त्याच्या पलीकडील घरांना तडे गेले आणि काचा फुटल्या आहेत.

दरम्यान, अश्फाक काझी आणि त्याचा मुलगा अमार अश्फाक काझी वय वर्षे २० हे जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अश्फाक काझी हे रिक्षा चालक आहेत. त्यांच्या घराला आग लागली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की जवळपास दोन किलोमीटरच्या परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. अश्फाक काझी पहाडे पाचच्या सुमारा घरी आले व त्यांनी लाईट लावली. त्यानंतरच स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. स्फोट इतका भीषण होता की आजुबाजूच्या घरांवरही त्याचा परिणाम झाला. स्फोटानंतर शेजारील घरांच्या काचा उडून काही जण जखमी झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number