महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मोचा चक्रीवादळाच्या धोक्याचे संकेत सर्वाना देण्यात आले आहेत. तर, हे चक्रीवादळ ७ ते ९ मे या दरम्यान सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह, केरळ आणि तामिळनाडूलाही जोरदार पावसामुळे सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच, मच्छिमारांना देखील चार दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सतर्क आणि तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. बंगाल उपसागराच्या अग्नेय भागात आणि परिसरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अग्नेय बंगालच्या उपसागरात ९ मे च्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र केंद्रित होण्याची शक्यता आहे. मध्य बंगालच्या उपसागराच्या दिशेने जवळजवळ उत्तरेकडे सरकताना ते चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान खात्याने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.